शासकीय रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुसज्ज करून आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी शासनाने अधिक निधी खर्च करावा-खा.डॉ.नामदेव किरसान यांची संसदेत मागणी

Fri 21-Mar-2025,09:19 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

गडचिरोली :: केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाकरीता 95,957 कोटी रुपयाची तरतूद केली असून त्यापैकी 9,406 कोटी रुपयाची तरतूद फक्त आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत खाजगी रुग्णालयात होणाऱ्या उपचाराबद्दल अनेक वेळा अनियमितता आढळून आली आहे त्याचप्रमाणे महालेखाकारांच्या तपासणीत 300 कोटी रुपयाचा घोटाळा सुद्धा उघडकीस आला आहे. तसेच योजनेअंतर्गत केलेल्या 6.66 कोटी दाव्या पैकी 562.4 कोटी रुपयाचे 2.7 लक्ष दावे खोटे आढळले असल्यामुळे. अशा भ्रष्टाचारयुक्त योजनानवर व जाहिरातीवर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा, शासकीय रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पात्र डॉक्टरांसह पायाभूत सुविधा व आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासन जास्तीत जास्त खर्च करणार का? जेणेकरून सर्वांना योग्य आरोग्य सेवा मिळण्यासाठी मदत होईल.असा प्रश्न व मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेत प्रश्नकाल दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचे कडे केली.